संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष पदी राहुल खोडसे यांची निवड

पुणे प्रतिनिधी : संभाजी ब्रिगेडचा नुकताच पुणे येथे महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडी व पदग्रहण सोहळा आयोजित केला होता त्यातच बीड (पूर्व) जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडच धडाडीचे नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख बीड जिल्ह्यातच न्हवे तर महाराष्ट्रात आहे असे राहुल सुरेखा सुंदरराव खोडसे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश प्रवक्ते गंगाधर बनबरे व सर्व प्रदेश कार्यकारिणीच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र पुणे येथील पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात जिल्हा अध्यक्ष पदगृहन सोहळ्याच्या कार्यक्रमात निवड करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणा-या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक मोठी संधी संभाजी ब्रिगेडने राहुल खोडसे यांची बीड पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने बीड जिल्हयात आनंद व्यक्त केला जात आहे. संभाजी ब्रिगेडचा विचार केज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात पोहोचविला असे. राहुल सुरेखा सुंदरराव खोडसे यांनी सामाजिक बांधिलकी मानून केलेले कार्य तसेच ते अनेक वर्षांपासून पुरोगामी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांची सामाजिक व राजकीय वाटचाल 2012 ला ते संभाजी ब्रिगेड या संघटनेत शाखाध्यक्ष पडपासून सुरुवात करून तालुका सदस्य, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा उपाध्यक्ष या पदावर काम करताना राहुल खोडसे यांनी विविध सामाजिक आंदोलने करून आपल्या नावाची ख्याती निर्माण केली आहे या सर्व कार्याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज दादा आखरे यांनी राहुल खोडसे यांची बीड पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान आपल्या निवडीविषयी आभार मानून बोलताना राहुल खोडसे यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेडचे संघटन वाढीवर भर देणार असून समाजातील प्रश्न सोडविणार आहोत. तसेच शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ होळकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या सामान्य माणसांवर होणा-या अन्याय-अत्याचारा विरूद्ध लढण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अहोरात्र जनसेवा करू असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राहुल सुरेखा सुंदरराव खोडसे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व आदींनी अभिनंदन केले आहे.




