केज-बीड मार्गावरील उमरी टोल नाका सुरु केज तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी पास चा लाभ घ्यावा.- सुमंत धस
केज प्रतिनिधी
केज ते बीड रस्त्यावर नव्याने कार्यान्वित झालेला टोल नाका सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू आहे. या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आता आपला ‘स्थानिक पास’ अनिवार्यपणे घ्यावा, अन्यथा त्यांना प्रत्येक वेळी टोल भरावा लागेल.एक बाजूच्या प्रवासाला चार चाकी वाहनाला ८५ रुपये मोजावे लागणार आहेत,दिवसातून अनेक वेळेस टोल वरून प्रवास करणारे अनेक वाहने केज तालुक्यातील आहेत त्या मुळे पास नसेल तर त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे,पैश्यांची बचत व्हावी यासाठी स्थानिक नागरिकांनी ३५० रुपयांचा महिन्याचा पास काढावा.
तसेच रोड वर कुठे अपघात झाला तर जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका व पलटी झालेल्या अपघातग्रस्त गाड्या उचलण्यासाठी टोल नाक्यावर क्रेन ची सुविधा उपलब्ध आहे.
स्थानिक रहिवाशांसाठी विशेष सवलत योजना लागू आहे, ज्याअंतर्गत आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि वाहनाची कागदपत्रे सादर करून पास मिळवता येईल.
या सुविधेचा लाभ घेऊन स्थानिकांनी टोल शुल्क वाचवावा आणि अधिकृत प्रक्रियेतून पुढे यावे,असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी जनतेला आवाहन केले आहे.




