Homeताज्या बातम्यासंभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका लढवणार

संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका लढवणार

*संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका लढवणार*

केज :-प्रतीनीधी.

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद – पंचायत समिती , महानगरपालिका , नगरपरिषदा , नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका संभाजी ब्रिगेड लढणार असल्याचे सूतोवाच नुकत्याच पार पडलेल्या राज्य कार्यकारणी बैठकी मध्ये संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ॲड मनोज आखरे यांनी केले आहेत.या अनूषंगाने बिड जिल्हाध्यक्ष राहूल खोडसे यांच्या अध्यक्षतेखाली व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोशाध्यक्ष तथा बिड संपर्कप्रमूख संतोषदादा गाजरे,प्रदेश संघटक अतुल भैय्या गायकवाड,विभागीय अध्यक्ष राहूल वायकर,विभागीय सचीव प्रवीण ठोंबरे, यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेतला असून सर्व जिल्हा पदाधीकारी, तालुका अध्यक्ष यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची तयारी सुरू केली असून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अनेक आंदोलने केली आहेत. सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्रा च्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला असून , शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे. संभाजी ब्रिगेड ने झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी लक्ष वेध आंदोलन केले. तरीही सरकार झोपेच सोंग करत आहे. पुन्हा संभाजी ब्रिगेड ने सत्ताधरी आमदार खासदार मंत्र्यांच्या घरासमोर जागरण गोंधळ आंदोलन केले मात्र गेंड्याच्या कातडीचे सरकार अजिबात संवेदनशिल होत नाही म्हणून संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते जिल्हा परिषद , पंचायत समिती सह नगर परिषद , नगरपरिषदेत निवडून आणून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करून जनतेचे प्रश्न सोडविण्या साठी निवडणुकीला सामोरे जात आहेत. महागाई , बेरोजगारी ने जनता त्रस्त झाली आहे. कापूस , सोयाबीन , कांदा उत्पादन शेतकरी अडचणीत आला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने पीडलेला बळी राजा कर्ज माफी ची वाट पहात आहे. विधानसभा निवडणुकीत आजच्या सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा ७/१२ करा करण्याचा शब्द दिला होता मात्र आता योग्य वेळ शोधत आहेत. महाराष्ट्रात दर दिवसाला ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत , राज्यात महिला सुरक्षित नाहीत , कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत , सत्ताधारि व विरोधी पक्ष गुंडांच पालन पोषण करण्यात दंग आहेत , आता राजकीय पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने फक्त संभाजी ब्रिगेडच जनतेचा आवाज होऊ शकते अशी परिस्थिती आहे. या वेळी महाराष्ट्रातील मतदार नक्कीच संभाजी ब्रिगेड ला पसंती देईल असा आम्हाल विश्वास आहे. स्थानिक राजकीय परिस्थिती नुसार समविचारी पक्षां बरोबर युती – आघाडी करून या निवडणूका लढण्यासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज झाली आहे. या बैठकीत विभागीय उपाध्यक्ष विलास गुंठाळ,जिल्हा अध्यक्ष राहुल खोडसे, मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष नागनाथ जाधव, केज तालुका अध्यक्ष जयदीप देशमुख, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव नारायण मुळे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अस्विनी ताई यादव, तालुका अध्यक्ष सुनंदा ताई लोखंडे संभाजी घोरपडे, तालुका अध्यक्ष आकाश नखाते,गजानन अंबाड जिल्हा संघटक,सचिन साखरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,संदीप शितोळे,अभिजित पवार, अजित धपाटे,नानासाहेब हंडीबाग, केशव टेहेरे,मनोज चौधरी, शेखर थोरात, राज तपसे, राहुल रुपदास, महादेव थोरात, संकेत चव्हाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ 

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ बीड/प्रतिनिधी महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले आहे त्यामुळे येणाऱ्या...

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड केज : संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणी अंतर्गत केज तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रक्रियेत शिवश्री आकाश नखाते यांची...

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण  प्राचार्य डॉ....

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रभाकर शेळके, ज्ञानेश्वर भामरे, डॉ. सुमती पवार, ज्ञानेश दुसाने, प्रा....

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी.

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी कुणबी प्रमाण पत्रामुळेच राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची श्रीकांत होरमाळे यांची भावना. प्रतिनिधी :...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग कसबे केज/प्रतिनिधी   पत्रकारिता ही समाजातील सत्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी...

error: Content is protected !!