Homeताज्या बातम्याखा.बजरंग सोनवणेंच्या वाढदिवसानिमीत्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणार आरोग् तपासणी

खा.बजरंग सोनवणेंच्या वाढदिवसानिमीत्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणार आरोग् तपासणी

खा.बजरंग सोनवणेंच्या वाढदिवसानिमीत्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणार आरोग्य तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे वैद्यकिय अधिक्षकांना पत्र

बीड ! प्रतिनिधी

बीडचे खा.बजरंग सोनवणे यांचा वाढदिवस दि.६ जुलै रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. तालुकास्तरावर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
खा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्याबाबत डॉ.संजय राऊत, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रूग्णालय बीड यांनी सर्व वैद्यकिय अधिक्षकांना याबाबत पत्र दिले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करयात येते. यामध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या बालकांची वर्षातून २ वेळा तर शासकीय आणि निमशासकीय शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. दरम्यान, दि.६ जुलै रोजी खा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमीत्त संपूर्ण बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीने वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाशी संपर्क करण्यात येत असून संबंधीत शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत जनजागृती करावी, असेही डॉ.संजय राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, यांनी म्हटले आहे. दरम्यान, यासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. वैद्यकिय अधिक्षक, सर्व जिल्हा/ उप जिल्हा/ ग्रामिण रुग्णालय, यांना पत्र पाठवून आपल्या अधिनस्त आरबीएसके अंतर्गत सर्व वैद्यकिय पथकांना सज्ज ठेवून आरोग्य तपासणी करावी, असे आदेश दिले आहेत.

या कार्यक्रमांचाही समावेश
केज शहर: उपजिल्हा रुग्णालय, केज येथे रुग्णांना साडी वाटप, फळ वाटप, बालाजी मंदिर येथे आरती, दर्गा येथे चादर अर्पण करणे,
वयोवृद्ध आश्रम येथे किट वाटप, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, शेतकरी महिलांचा सन्मान असे विविध कार्यक्रम. रक्तदान शिबीर: येडेश्वरी कारखाना आनंदगाव सा, आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई, घाटनांदूर, धारूर, वाघोली,सिरसाळा. इतर सामाजिक उपक्रम: बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात शालेय साहित्य वाटप, फळ वाटप, वृक्षारोपण, फराळीचा कार्यक्रम होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!