*दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्तेने संगमनेर येथील सीबीएसई क्लस्टर, साऊथ झोन २ ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत मिळविले कांस्यपदक*

परळी (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यामध्ये दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल नेहमीच अग्रेसर असते. सदरील शाळेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते याने सीबीएसई क्लस्टर, साऊथ झोन २ ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवून याची प्रचिती दिली. सदरील स्पर्धा नाशिक संगमनेर येथे ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट दरम्यान पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये भरपूर स्पर्धक सहभागी झाले होते, या सर्वांशी स्पर्धा करत सदरील विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश मिळविले आहे. त्याच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम ,शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते सर (सचिव,त्रिपुरा सरकार) व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांनी दिपकचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच त्याच्या या यशामागे खंबीरपणे उभे असलेले त्याचे कोच वडील श्री.गोविंद गित्ते, शाळेचे क्रीडाशिक्षक राजु कडावत, शाळेच्या कोच कु.संघमित्रा हुमने मॅडम यांचेही अभिनंदन केले.त्याने केलेल्या या नेत्र दीपक कामगिरीबद्दल शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक अशा सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




