Homeसामाजिकमाननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनामध्ये धारुर पोलीसांच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी पथनाट्य...

माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनामध्ये धारुर पोलीसांच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी पथनाट्य घेत दिली व्यसनमुक्तीची शपथ

माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनामध्ये धारुर पोलीसांच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी पथनाट्य घेत दिली व्यसनमुक्तीची शपथ

सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व ज्युनिअर चार्ली फाउंडेशन यांनी चार्ली चाप्लिनच्या वेशभूषेत केली व्यसनमुक्तीची जनजागृती

धारूर प्रतिनिधी:

व्यसनमुक्त भारत अभियान

बीड पोलीस व चार्ली चाप्लिन यांनी धारुर पोलीस स्टेशन हद्दीत जनजागृती पर पथनाट्य सादर केले.यामध्ये नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना व्यसनामुळे कॅन्सर सारख्या आजाराने कसे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.काहींचे संसार मोडले दारू गांजा चरस सिगारेट गुटखा आदींच्या व्यसनामध्ये तरुणांचे प्रमाण खूप वाढले आहे ते कुठेतरी थांबावे यासाठी श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारुर शाळेत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.तसेच व्यापक जनजागृतीचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना

अंमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, त्यामागील गुन्हेगारी साखळी,कायदेशीर शिक्षा आणि सुरक्षित पर्यायांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.सोमवार,दि. १८ ऑगस्ट रोजी धारुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.चार्ली चॅप्लिनच्या मुख अभिनयाच्या माध्यमातून समाजसेवक सुमित पंडित आणि सोमनाथ स्वभावणे यांनी विविध पथनाट्य द्वारे लोकांना हसवीत सहज व्यसनमुक्तीचे धडे दिले.व व्यसनाधीन व्यक्तीनां प्रत्येक्ष पकडून व पानटपरी धरिला गुटखा जप्त करुन तो जाळ्यात आला.धारुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.देविदास वाघमोडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत,’अंमली पदार्थांचे व्यसन केवळ वैयक्तिक आयुष्यच उद्धस्त करीत नाही, तर कुटुंब, समाज आणि भविष्यासाठ मोठा धोका ठरते असा इशारा दिला. व्यसनांमुळे होणारे सामाजिक,आर्थिक आणि आरोग्यविषयक नुकसान प्रभावीपणे मांडले. हे जनजागृती अभियान केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण ग्रामीण भागात पोहोचावे, अंमली पदार्थांविरोधात कठोर मानसिकता तयार व्हावी,हा यामागचा उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरीकांतून स्वागत होत आहे.धारुर तालुक्यातील ग्रामीण भागात ‘नशामुक्त बीड जिल्हा आपला संकल्प,आपलं भविष्य आपल्या हाती ! हे अभियान बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कांवत,अप्पर पोलीस अधीक्षक,चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धारुर ग्रामीण पोलीस ठाण्याचे साय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या पुढाकाराने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ‘व्यसन नष्ट करणे म्हणजे केवळ स्वतःचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे रक्षण करणे.”, अंमली पदार्थ आणि नशा आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि प्रगतीसाठी घातक आहेत.. व्यसनांमुळे स्वप्नं विझतात,नाती तुटतात, आणि आयुष्य अंधारात जातं.तरूणांना आणि मुलांना नशेच्या सापळ्यात अडकू देऊ नका.आपलं गांव,नशामुक्त गांव चला, एकत्र येऊन हे शक्य करू हा विधायक संदेश घेऊन बीडच पोलीस व धारुर पोलिस ठाणे काम करीत आहे. चला, नशेच्या अंधारावर प्रकाश टाकूया नशामुक्त, निरोगी आणि प्रेरणादायी बीड जिल्हा घडवूया..! असा संकल्प जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने हाती घेतला आहे.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून धारुर येथील मुख्य बस स्थानक शिवाजी महाराज चौक तसेच श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल या शाळेत अंमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून अभियान राबविण्यात आले.त्यास अनुसरून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच ‘पोक्सो’ या कायद्याची माहिती देण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड यांनी धारुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.वाघमोडे व सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित चार्ली फाउंडेशन चे सोमनाथ स्वभावणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वागत सत्कार केला. ह्या कार्यक्रमात पोलीस स्टेशन धारूर,स

कर्मचारी, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपस्थितांचे आभार समाजसेवक सुमित पंडित यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!