‘समृध्द व्यापार’ चे संपादक दत्तात्रय जी परळकर सपत्निक ” शिवरत्न ” पुरस्काराने सन्मानित

लातूर(शहर प्रतिनिधी)- लातूर शहरातील प्रख्यात व्यावसायिक, आर्थिक, कायदेशीर व सामाजिक विषयावरील सजग वृत्तांकनासाठी ओळखले जाणारे समृध्द व्यापारचे संपादक दत्तात्रय जी परळकर यांना यंदाचा ‘शिवरत्न पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. लातूर मिशन वृत्तपत्राचा 12 वा वर्धापन दिन आणि मा मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लातूर मिशन वृत्तपत्र आणि शिवदर्शन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून ह.भ.प. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री, उद्घाटक मा. राज्यमंत्री विनायकराव पाटील, कळंब धाराशिवचे आ. कैलास घाडगे पाटील, मा.महापौर अॅड.दिपक सुळ तर प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना देशमुख, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
याप्रसंगी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरणाच्या प्रसंगी दत्तात्रय जी परळकर यांच्या कार्याचा विशेष गौरव उल्लेख करण्यात आला. पत्रकारितेत प्रामाणिकता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक बांधिलकी जपत, त्यांनी केलेल्या लेखनामुळे लातूरकरांना योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले असल्याची भावना यावेळी अध्यक्षांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत जाधव यांनी केले तर बालाजी कांबळे यांनी सुत्रसंचलन केले. याप्रसंगी उपस्थित मित्र परिवारांनी संपादक दत्तात्रय जी परळकर यांची भेट घेत त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांना शुभेच्छा व त्यांचे अभिनंदन केले. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.




