खा.बजरंग सोनवणे लोक सेवेत अग्रेसर,कर्करोग ग्रस्तांच्या मदतीसाठी खा.सोनवणेंचे प्रयत्न, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ३ लाखांची मदत मंजूर

केज/प्रतिनिधी :- केज तालुक्यातील कुंबेफळ येथील ऋषिकेश बाळासाहेब घाडगे यांच्या कर्करोगाच्या उपचारा साठी खा.बजरंग सोनवणे सरसावले असून यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून ३ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.यामुळे सदैव संकटात मदतीला,दारात देवमाणूस अवतरला, अशी भावना रूग्ण आणि नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.ऋषिकेश यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील डॉ.रवींद्र कोडलीकेरी मेमोरियल हॉस्पिटल,येथे कर्करोगा वरील उपचार सुरू आहेत.उपचारासाठी येणाऱ्या खर्चाचा काही भाग भागवण्यासाठी ही आर्थिक मदत देण्यात आली असून,रुग्णालयास थेट खर्चाच्या तपशीला सह आवश्यक कागदपत्रे पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या पत्रानुसार,मंजूर करण्यात आलेली रक्कम ही उपचारादरम्यान झालेल्या प्रत्यक्ष खर्चापुरतीच मर्यादित राहणार आहे. तसेच रुग्णालयाने उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून रुग्णाची माहिती व उपचाराचा तपशील वेळेत सादर करणे आवश्यक आहे.रुग्णाच्या अर्जाची नोंद दि.२० डिसेंबर २०२५ रोजी पंतप्रधान कार्यालयात झाली होती. या आर्थिक मदतीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या ऋषिकेश आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.या प्रकरणात खा.बजरंग सोनवणे यांनी पाठपुरावा केल्याने मदत मंजूर झाली आहे.सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी हामोठा आधार ठरत असून बीड जिल्ह्यातील रूग्णांसाठी खा.बजरंग सोनवणे कायम पाठपुरावाकरताना दिसत आहेत.आजवर अनके रूग्णांना त्यांच्या मुळे मदत झालेली असून संकटकाळी हक्काचा खासदार म्हणून सोनवणे यांच्याकडे मदतीचा हात मागीतला जात आहे. जिल्ह्यातील रूग्णांना मदत मिळून देण्यासाठी खा.सोनवणे यांनी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. संबधित यंत्रणेच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.याबद्दल खा.बजरंग सोनवणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.




