Homeताज्या बातम्याजीवाचीवाडीत विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जीवाचीवाडीत विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

केज / प्रतिनिधी :- दि. २६ जानेवारी रोजी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, आरोग्य संस्था व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाले.

युनानी दवाखाना, जीवाचीवाडी येथे सैनिक सतीश चौरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचारी श्रीम. सुरेखा सानप व श्रीम. वर्षा गव्हाने उपस्थित होत्या. पशुवैद्यकीय दवाखाना येथे संस्थाप्रमुख शिद्धेश्वर रासवे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले.

कै. श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामीण ग्रंथालय येथे मुख्याध्यापक अंकुश मोराळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष गोकुळ सारूक, ग्रंथपाल सुभाष सारूक, शोभाताई चौरे, वाचक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानवस्ती (जी) येथे मुख्याध्यापक गोकुळ सारूक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी महिला कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जीवाचीवाडी येथे सैनिक सतीश चौरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थित पालकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालय, जीवाचीवाडी येथे गावच्या प्रथम नागरिक तथा महिला सरपंच श्रीम. प्रेरणा काळे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. यावेळी शालेय विद्यार्थी, अंगणवाडी महिला कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच जीवाचीवाडी गावात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सर्व संस्थांच्या सहभागातून उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न केज (प्रतिनिधी) : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नवीन न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला...

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

error: Content is protected !!