कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय याचे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश 
केज प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव द्वारा आयोजित दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी श्री व्यंकटेश महाजन कॉलेज धाराशिव येथे जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशीच्या कनिष्ठ विभागातील 19 वर्षाखालील मुली व मुले यांनी क्लीन अँड जर्क व स्न्याच मध्ये यश संपादन केले
त्यामध्ये 48 केजी वजन गटात कु. धनश्री गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक 58 केजी वजन गटात कु. दीक्षा झोरे द्वितीय क्रमांक 69 केजी वजन गटात कु. राजनंदिनी चव्हाण द्वितीय कु. श्रुती सावंत तृतीय क्रमांक 77 की. समीक्षा वाघमारे प्रथम तर कु. मानसी यादव हिने तृतीय क्रमांक मिळवला 86kg गटामध्ये कु. प्रतीक्षा वाघमारे यांनी प्रथम क्रमांक तर कु.प्रतीक्षा गायकवाड द्वितीय क्रमांक मुलांमध्ये 71 केजी गटात साद मुजावर यांनी प्रथम क्रमांक मिळवला 60 केजी वजन गटात हर्षल चेडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व विजयी खेळाडूंचे प्राचार्य डॉ. अशोक कदम सर यांनी कौतुक केले तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी.पाटील साहेब खजिनदार जयकुमार शितोळे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री शशीकांत सरवदे सर यांनी केले. आदरणीय प्राचार्य डॉ. ए बी कदम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व आभार श्री अजित तिकटे सर यांनी मानले.तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




