Homeताज्या बातम्याक्षेत्र चाकरवाडी महाराष्ट्रातच काय जगभरात पोहश्रीचली आहे नाना महाराज कदम यांचे प्रतिपादन..

क्षेत्र चाकरवाडी महाराष्ट्रातच काय जगभरात पोहश्रीचली आहे नाना महाराज कदम यांचे प्रतिपादन..

 क्षेत्र चाकरवाडी महाराष्ट्रातच काय जगभरात पोहश्रीचली आहे नाना महाराज कदम यांचे प्रतिपादन..

केज प्रतिनिधी – चाकरवाडी येथील ग्रामस्थांच्या पूर्वजांनी पुण्य केले आहे सद्गुरु बाळनाथ महाराजांची तपश्चर्या फळाला आली म्हणून सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली दादा चाकरवाडी मध्ये आले आहेत. दादा श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये आल्यापासून अखंड अन्नदान सेवा चाकरवाडी मध्ये सुरू आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह पार पडला यामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने भावी भक्तांनी महाप्रसाद घेतला. यावेळी चाकरवाडी ही महाराष्ट्रातच काय तर जगभरामध्ये पोहोचली आहे. जगभरातून आता दादा माऊलींच्या दर्शनासाठी भाविक भक्त चाकरवाडी या ठिकाणी येतात. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बाळनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे तपोनिधी शांतीब्रह्मा ह भ प महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा झी टॉकीज फेम ह.भ.प.प्रा डॉ नाना महाराज कदम नेकनुर यांची संपन्न झाली.

महाराजांनी जगद्गुरु श्री संत श्री तुकोबाराय यांच्या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या अभंगावर ती चिंतन केले. महाराजांनी चिंतन करत असताना परमात्म्याचे तटस्थ लक्षण व स्वरूप लक्षण सांगितले जगाचा मालक पांडुरंग परमात्मा किती सुंदर आहे हे सांगितले.अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान, कमरेवर हात ठेऊन विटेवर उभा आहे .त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे पीतांबर नेसलेला आहे असे हे विठ्ठालाचे रूप मला नेहमीच आवडते .मसोळीच्या आकारची कुंडले त्याच्या कानात झळकत आहेत गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे .तुकाराम महाराज म्हणतात की, हे ध्यान माझे सर्वसुख आहे असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडिने पाहीन. देवाकडे जा देव तुम्हाला मुक्त केल्या शिवाय राहणार नाही देवाकडे तुम्ही कोणत्या पण रूपात गेलात तर देवाला सगळे सारखेच असतात त्यासाठी देव तुम्हांला मुक्त केल्या शिवाय राहत नाही. असे महाराजांनी आपल्या अभंगातून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

विठ्ठल कोणाला म्हणावे, सुंदर कोणाला म्हणावे, आपले कोण आहे, देवाकडे का पाहावे, देवाकडे का जावे महाराजांनी सांगताना सांगितले की या जगामध्ये देवा शिवाय आपले कोणाच नाही.मानवाला सौंदर्य देणारा तो देव आहे, प्रत्येक मानवाला जे सौदर्य दिले आहे ते भगवान परमात्म्याने दिलेले आहे. देवापुढे कोणालाच माफ केलं जात नाही. आपले भविष्य पाहण्यासाठी कोणाकडे हात दाखवू नका आपले भविष्य चांगलेच आहे आपला वर्तमान चांगला असेल तर भविष्य चांगलेच आहे ज्याचे अंतःकरण स्वच्छ आहे, सुंदर आहे त्याला तुम्ही सुंदर म्हणा. आपले सौंदर्य हे कधी तरी संपणारे आहे देवाचे सौंदर्य कधी न संपणारे भारी आहे की देवाचे सौंदर्य हे कधीही संपणारे नाही ते आनंदमय आहे. अविनाशी आनंदघन अमूर्त मूर्ती मधुसूदन देवाच्या सौंदर्याकडे जर पाहील तर आनंद होतो.देव तुमच अंतःकरण पाहिल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी अभंगामधून भाविकांना अनेक संदेश देत आपली सेवा संपन्न केली.

यावेळी गायनाचार्य सतीश महाराज जाधव, महादेव महाराज रोडे, पिंपळे महाराज , माखले महाराज मृदंगाचार्य अमोल महाराज पवार, आविष्कार महाराज क्षीरसागर तसेच त्रिंबक महाराज शेळके, अनिकेत महाराज अनवाने, प्रशांत महाराज क्षीरसागर, श्री क्षेत्र चाकरवाडी चे पोलीस पाटील नानासाहेब काकडे, पत्रकार अभिजीत पवार, ज्ञानोबा अनवणे, ग्रामसेवक सुरवसे साहेब, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ 

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ बीड/प्रतिनिधी महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले आहे त्यामुळे येणाऱ्या...

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड केज : संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणी अंतर्गत केज तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रक्रियेत शिवश्री आकाश नखाते यांची...

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण  प्राचार्य डॉ....

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रभाकर शेळके, ज्ञानेश्वर भामरे, डॉ. सुमती पवार, ज्ञानेश दुसाने, प्रा....

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी.

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी कुणबी प्रमाण पत्रामुळेच राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची श्रीकांत होरमाळे यांची भावना. प्रतिनिधी :...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग कसबे केज/प्रतिनिधी   पत्रकारिता ही समाजातील सत्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी...

error: Content is protected !!