बीड जिल्हयातून बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांचा ही येथील लोक जिव्हाळा ठेवतात – प्रा.ईश्वर मुंडे
अधिवेशनादरम्यान नवल किशोर राम व प्रा.ईश्वर मुंडे यांची भेट
मुंबई (प्रतिनिधि) बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व शेती अधारीत उत्पन्न कमी आसले तरी बीड जिल्ह्यातील लोक कष्टाळू,मेहनती तेवढेच प्रेमळ आहेत.
बीड जिल्ह्यात अधिकारी म्हणून आलेल्या प्रमाणीक अधिकाऱ्यांना सहकार्य व प्रेम देऊन त्यांना डोक्यावर घेतात याची अनेक उदाहरणे घडलेले आहेत.
या मध्ये महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार,सेच्छा सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर तसेच नवल किशोर राम,आशोक धिवरे,अखिलेश कुमार या आय.ए.एस. व आय.पी.एस.अधिकाऱ्यांची नावे सर्व जिल्हावाशीयांच्या मनात व ओठांवर आहेत.
सध्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन विधान भवन मुंबई येथे चालू आहे.या अधिवेशनादरम्यान स्वेच्छा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा.ईश्वर मुंडे व पुणे महानगर पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट झाली.उभयतांनी स्मीत हास्य,प्रेमाणे हस्तांदोलन केले.बीड जिल्ह्य़ातील विविध विषयांवर थोडक्यात चर्चा केली.
बीड जिल्हयाचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बीड जिल्ह्य़ात नाविन्यपूर्ण काम केले होते.त्यांची बीड नंतर जिल्हाधिकारी संभाजीनगर,जिल्हाधिकारी पुणे,पंतप्रधान कार्यालय दिल्ली येथे बदली झाली.आता ते पुणे महानगर पालिकेचे आयुक्त आहेत.
प्रा.ईश्वर मुंडे व नवल किशोर राम यांची भेट म्हणजे अधिकारी बीड जिल्ह्य़ातून बदलून गेले तरी जिल्हयातील लोक आठवणी,प्रेम व जिव्हाळा कायम ठेवतात हेच सिध्द होते.
