महिला अन्याय अत्याचाराच्या विरोधात | गायरान धारकांच्या हक्कात..! आझाद क्रांती सेना मैदानात..!! : शरद थोरात
केज प्रतिनिधी
बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गायरान धारकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या न्याय हक्कांसाठी सरकारला विचारणा करणे अनिवार्य झालेले आहे. हक्क मागितल्याशिवाय मिळत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यातच खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून गायरान धारकांना टार्गेट करून त्यांच्या जमिनी हडप करण्याचा सरकारचा प्रयत्न आता उघड झालेला आहे. “हक्क मागून मिळत नसतात, तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो” हीच संघर्षमय कहाणी ताकतीने लिहिण्यासाठी आझाद क्रांती सेना मैदानात उतरलेली असून संपूर्ण बीड जिल्ह्यातून व केज तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केज तालुका अध्यक्ष मा.शरद थोरात यांनी केले आहे.
