श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन
==================================
संतांच्या पायी नतमस्तक झाल्यावर सर्व मानवी विकार नष्ट होतात:- ह.भ.प.महादेव महाराज राऊत
==================================
केज ।
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंखड हरिनाम सप्ताह व संत सावता महाराज जीवन चरित्र कथा वाचन सोहळ्याचे आयोजन दि. १६/०७/२०२५ ते दि. २३/०७/२०२५ या काळात करण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्री संत सावता महाराज मंदिरात वैकुंठवासी ह.भ.प. रामकृष्ण महाराज वरपगावकर व वैकुंठवासी ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज उत्रेश्वर पिंप्रीकर यांच्या कृपा आशिर्वादाने व जेष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राम प्रभु राऊत (मेजर) व ह.भ.प. मृदंग अलंकार विलास महाराज कोरडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व संगीत विशारद ह.भ.प.सुमंत महाराज डाके व ह.भ.प. बाळु महाराज कोरडे, ह.भ. प.वैभव महाराज फुलझळके यांच्या सुमधुर गायनाने आणि ह.भ.प. मृदंग अलंकार विलास महाराज कोरडे यांच्या पखवाज वादनाने व श्री संत सावता यंग ग्रुप व गावातील तरुण मंडळींच्या सहकार्याने भव्य दिव्य अंखड हरिनाम सप्ताह व संत सावता माळी जीवन चरित्र वाचन सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांना मिळणार आहे
दि. १६ जुलै रोजी महंत ह.भ.प. महादेव महाराज बोराडे यांचे, व दि. १७ जुलै रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांचे अमृततुल्य किर्तन संपन्न झाले.
यावेळी
श्री संताचीया माथा चरणावरी |
साष्टांग हे करी दंडवत ||
या अभंगावर विवेचन करताना मानवी जिवनात संताशी नतमस्तक होऊन पाया पडण्याचे महत्त्व आपल्या ढंगदार शैलीत विशद केले. तसेच
दि. १८ जुलै रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज रामानंद मठ संस्थान माजलगाव यांचे, दि. १९ जुलै रोजी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे, दि. २० जुलै रोजी ह.भ.प.सुमंत महाराज डाके यांचे, किर्तन व याच दिवशी रात्री ९.३० ते १२.०० या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडकार ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड, आळंदीकर यांचा बहारदार सोंगी भारुडाचा कार्यक्रम होईल व दि. २१ जुलै रोजी ह.भ.प. प्रणिताताई गवारे यांचे, तर दि. २२ जुलै रोजी ह.भ.प. कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रुर महाराज साखरे गेवराई यांचे, व दि. २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. महंत भगवान महाराज पुरी शिवरामपुरी मठ संस्थान, वरपगाव यांचे काल्याचे अमृत तुल्य कीर्तन होणार असून त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक जेष्ठ नेते राम प्रभु राऊत मेजर, अभिजित राऊत, बाळु राऊत, यांच्यासह श्री. संत सावता यंग ग्रुप व तरुण मंडळ, व गावकरी यांनी केले आहे.




