आझाद क्रांती सेनेच्या शाखा स्थापनेला वेग आला असुन नुकतेच डाके पिंपरी येथे एका नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.
माजलगाव | प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील डाके पिंपरी या ठिकाणी दि.३१ जुलै २०२५ रोजी आझाद क्रांती सेनेची शाखा स्थापन करण्यात आली असून तेथील युवकांनी आझाद क्रांती सेनेचे सेना प्रमुख राजेशजी घोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भव्य दिव्य शाखा स्थापनेचा कार्यक्रम केला. सदरील शाखेचे उद्घाटन माजलगावचे तालुकाप्रमुख अशोकजी ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. डाके पिंपरी येथील असंख्य युवकांनी आझाद क्रांती सेनेमध्ये प्रवेश घेतला. येथील शाखा उद्घाटन प्रसंगी सेना प्रमुख राजेशजी घोडे यांनी युवकांना बहुमोल असे मार्गदर्शन करताना यावेळी ते म्हणाले की विषमतावादी व्यवस्था संपवण्यासाठी बंड करावे लागेल. गरीब हा गरीब होत चाललेला आहे व श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे. देशात एक वेगळी विषमता निर्माण होत चालली असून ही विषमता संपवण्यासाठी आझाद क्रांती सेनेची मशाल आपण हातात घेतली असल्याचे यावेळी बोलताना राजेशजी घोडे म्हणाले, ही मशाल तुम्ही तेवत ठेवा, या मशालीमध्ये आम्ही आमच्या रक्ताचं तेल करून टाकू, ती ज्वलंत ठेवू, आझाद क्रांती सेना हे फक्त नाव नसून हा एक विचार आहे. जो विस्थापित गावकुसाबाहेरील गरीब वंचित शोषितांचा आवाज म्हणजे आझाद क्रांतीसेना होय, या संघटनेमध्ये अठरापगड जमातींना घेऊन हे संघटन मागासलेल्या समाजाला शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी आझाद क्रांती सेनेचा जन्म झालेला असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी अशोक ढगे, किसन भिसे, शाहीर साळवे, यांचीही भाषणे झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सरपंच रमेशजी आल्हाट, जेष्ठ नागरिक युवा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये नव चेतना घेऊन सामिल झाला होता. शहरांमधून भव्य मोटर सायकल रॅली काढून डाके पिंपरी येथे शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शाखेचे (अध्यक्ष) गणेश आल्हाट, (उपाध्यक्ष) लखन आलाट, (महासचिव) बालासाहेब आल्हाट, (सहसचिव) हनुमंत आढागळे, (सल्लागार) राम शेरकर, (कोषाध्यक्ष) बालासाहेब आल्हाट, (सहसंघटक) भागवत घोंगडे हे असून हा कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी गावातील तरुणांनी परिश्रम घेतले.
