Homeताज्या बातम्याक्रांती नगरमध्ये प्रजासत्ताक दिनाचा गौरवशाली उत्सव जि.प. प्राथमिक शाळेत प्रभात फेरी,...

क्रांती नगरमध्ये प्रजासत्ताक दिनाचा गौरवशाली उत्सव जि.प. प्राथमिक शाळेत प्रभात फेरी, ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक सहभागातून राष्ट्रभक्तीचा जागर

क्रांती नगरमध्ये प्रजासत्ताक दिनाचा गौरवशाली उत्सव

जि.प. प्राथमिक शाळेत प्रभात फेरी, ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक सहभागातून राष्ट्रभक्तीचा जागर

केज | प्रतिनिधी:- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, क्रांती नगर (केज) येथे अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात प्रभात फेरी, ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे प्रभात फेरीने परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखा ताई इंगळे या होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुराव गालफाडे सर, आझाद क्रांती सेनेचे तालुका उपप्रमुख अनिल लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते इरफान पठाण,सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड, प्रेम गायकवाड, मजहर तांबोळी,दिपक पवार, अशोक मस्के,प्रमोद तांदळे,अजय गालफाडे,लखन लांडगे,किरण बडे,दिपक गायकवाड, नेहाल कांबळे,रोहन मस्के,अर्जुन शिंदे,अभिषेक लोखंडे,वर्षा लांडगे, नेहरकर मॅडम, पत्रकार तथा शेतकरी जनहित कामगार संघटनेचे पांडुरंग कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लहानग्यांनी सादर केलेल्या कवायतींनी कार्यक्रमात शिस्त, देशप्रेम आणि संस्कारांची झलक दाखवली. गेल्या पंधरा दिवसांपासून शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना क्रांती नगर भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही प्रभावी भाषणे केली. शिवकन्या, गौरी, तथा सामाजिक कार्यकर्ते प्रेम गायकवाड यांचे चिरंजीव आणि कैफ शेख या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती, संविधान, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी यावर आपले विचार मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांसाठी खाऊ-बिस्किटांची व्यवस्था अनिल अण्णा लोखंडे व मजहर तांबोळी यांच्या माध्यमातून करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कर्तव्यदक्ष नगरसेवक अझर भैया इनामदार यांच्या पुढाकारातून शाळेची डागडुजी, रंगरंगोटी व सुशोभीकरण करून शाळेला नवसंजीवनी देण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळेच्या संयोजन समितीचा मोलाचा वाटा होता. मुख्याध्यापक शिनगारे सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे घोरपडे सर, विद्यार्थ्यांची तयारी करून घेणाऱ्या सुतार मॅडम, बचुटे सर यांनी शाळेची खरी धुरा समर्थपणे सांभाळली.

या कार्यक्रमाला क्रांती नगर भागातील पालकवर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व स्तरातून मिळालेल्या सहभागामुळे कार्यक्रम सामाजिक एकतेचे आणि शैक्षणिक जागृतीचे प्रभावी उदाहरण ठरला.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक शिनगारे सर यांनी आवाहन केले की, “जि.प. प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी पुढे येऊन आपल्या मुलांना याच शाळेत प्रवेश द्यावा. शासकीय शाळाच समाजाची खरी शैक्षणिक शिदोरी आहे.”

कार्यक्रमात बोलताना पांडुरंग कसबे यांनी शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी शिनगारे सर व सर्व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले. पालकांचा सक्रिय सहभाग प्रेरणादायी असल्याचे सांगत, शाळेला वेळोवेळी मदत करणाऱ्या सर्व समाजघटकांचे त्यांनी आभार मानले. भाषण करणाऱ्या शिवकन्या, गौरी व कैफ यांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

सर्व मान्यवर, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम केवळ उत्सव न राहता, शिक्षण, समाजभान, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा एक प्रेरणादायी आदर्श ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!