येवता सर्कलमध्ये युवा नेते विष्णू घुले साठी कार्यकर्त्याची फौज लागली कामाला.
केज प्रतिनिधी.
केज तालुक्यात नवीन झालेला जिल्हा परिषद गट म्हणजे येवता हा जिल्हा परिषद गट भारतीय जनता पार्टीला जाण्याची शक्यता दाट शक्यता असल्याने या जिल्हा परिषद गटत सध्या युवा नेते विष्णू घुले साठी कार्यकर्त्याची फौज कामाला लागलेली दिसत आहे
मागील पंधरा दिवसा पासून युवा नेते विष्णू घुले यांचे समर्थक चांगलेच कामाला लागलेले दिसतात
येवता सर्कल घोषित होताच युवा नेते विष्णू घुले पण सर्कलमध्येच चांगल्या प्रकारे फिरताना दिसतात
युवा नेते विष्णू घुले यांच्या पत्नी मागील काळात पंचायत समिती सभापती होत्या त्या कारणाने गावा गावात चांगलाच संपर्क आहे
येवता सर्कलमध्ये टाकळी उमरी डोनगाव शिरपूरा कोरेगाव मस्साजोग कोठी येवता काशीदवाडी कोल्हेवाडी तरनळी कासारी कानडीमाळी लव्हुरी साबला धर्माळा नागझरी या गावातचा येवाता जिल्हा परिषद गटात समावेश आहे या गावात युवा नेते विष्णू घुलेचा चांगला जनसंपर्क आहे भारतीय जनता पार्टी मध्ये पण विष्णू घुले यांचे चांगले वजन आहे
पक्षात पण युवा नेते विष्णू घुले सारखा खमक्या नेता असल्याने कार्यकर्ते सुद्धा जोमाने कामाला लागलेले दिसत आहे
युवा नेते विष्णू घुले यांच्या पत्नी केज पंचायत समितीच्या सभापती असताना बऱ्याच लोकांची त्यांनी कामे केलेली आहेत त्यामुळे युवा नेते विष्णू घुले साठी कार्यकर्त्याची फौज कामाला लागलेली दिसत आहे.

