*ॲड. आदर्श अरुणराव जाधव यांना २०२५ चा “समाज रत्न पुरस्कार प्रदान!**
बीड
न्याय, सत्य आणि सामाजिक बांधिलकीचे भान असलेल्या कार्यकर्त्यांच्या पंक्तीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ॲड. आदर्श अरुणराव जाधव यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती तसेच आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २०२५ सालचा“समाज रत्न पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार सामाजिक समता, न्यायहक्क, युवक मार्गदर्शन, वंचितांचे सक्षमीकरण, आणि कायद्यातून सामाजिक परिवर्तन या क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची पावती आहे. ॲड. जाधव यांनी आपल्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने च्या माध्यमातून व राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस परिवार , पोलीस कर्मचारी पोलीस पाल्य यांचा विविध प्रश्नासाठी नेहमी च काम केले व त्या समस्या सोडवल्या तसेच त्यांचा वकिली कार्यातून अनेक गोरगरीब, शोषित, उपेक्षित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे.
ॲड.जाधव हे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मध्ये राज्य सचिव (लीगल सेल) या पदावर कार्यरत असून महाराष्ट्रभर समाजासाठी,पोलीस परिवारासाठी, काम करत आहेत.
पुरस्कार प्रदान समारंभात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते विश्वास मोहिते (संस्थापक अध्यक्ष, दिपक मोहिते डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच)
उपाध्यक्ष असलम शेख
उपाध्यक्ष भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परीषद,
विकास भैय्या शेलार (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अहिल्या नगर) जिल्हा प्रमुख संपतराव मोहिते
पुरस्कार निवड समिती अध्यक्ष व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अनेकांनी ॲड. जाधव यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना त्यांना *“तरुणांच्या आशेचा दीपस्तंभ”* अशी उपमा दिली.
या सन्मानाबद्दल ॲड. जाधव म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी सन्मानापेक्षा जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. समाजासाठी मी अधिक निष्ठेने कार्यरत राहीन, हेच अभिवादन अण्णाभाऊ साठेंना असेल.” व समाजा ची सेवा करत राहील. हा माझा प्रथम पुरस्कार मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आई वडील यांना समर्पित करतो…
त्यांच्या या यशामुळे मित्र परिवार व सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे नव्या पिढीसमोर एक नवा आदर्श उभा करणाऱ्या या कार्यकर्त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!





