Homeताज्या बातम्याअंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही आरोपीसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही आरोपीसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

  • *अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही*
    आरोपीसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई प्रतिनिधी :पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची हिंगोली येथून सांगली येथे जाण्यासाठी 30 टन हळद ज्याची किंमत 41 लाख 75 हजार 535 रुपये ही घेऊन निघालेल्या ट्रक क्रमांक एम एच 26 ए डी 2935 यास अंबाजोगाई जवळील लोखंडी सावरगाव परिसरात दिनांक 01/10/2025 रोजी अडवून पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी गाडीचा चालक सय्यद अजगर यास चाकूची भीती घालून मारहाण करून ट्रक चोरून नेला अशा सुरुवातीच्या माहितीवरून व नंतर ट्रकचालक सय्यद अजगर आणि ट्रक मालक नदीम खान यांनीच हे बनावट व खोटा देखावा तयार करून स्वतःच ट्रक मधील हळद चोरून नेऊन त्यांच्याकडे विश्वासाने सोपवलेले मुद्देमाल चोरीस गेले अशी पोलिसांना व फिर्यादीला खोटी माहिती देऊन फसवणूक केली म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक 332/2025 कलम 316 (2), 316 (3), 318 (4), 217, 3 (5) भारतीय न्यास संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांच्याकडे देण्यात आला.
गुन्ह्यात चोरी गेलेला चाळीस लाखाचा मुद्देमाल व आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश शिंदे यांनी पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांना तपास पथक तयार करून तात्काळ मुद्देमाल व आरोपी यास ताब्यात घेण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले व त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक खोकले यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक असद शेख, एएसआय रमेश शिरसाट, पोलीस हवालदार किसन घोळवे यांचे पथक परभणी येथे रवाना केले.

गुन्हे शोध पथक परभणी जिल्ह्यात रवाना होऊन अतिशय शिताफिने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी गेलेला चाळीस लाखांच्या मुद्देमालाचा शोध घेऊन 24 तासाच्या आत आरोपी व मुद्देमाल यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे हजर केले.
बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ऋषिकेश शिंदे व पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख असद शेख यांच्या पथकाने आरोपीचा 24 तासांच्या आत शोध घेऊन आरोपींकडून चोरीस गेलेली चाळीस लाखांची 570 पोते हळद ताब्यात घेतल्यामुळे पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

गुन्ह्याचे तपासामध्ये पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर खोकले, तपासी अधिकारी श्री. रंगनाथ जगताप, डीबी पथकाचे श्री. असद शेख, पोलीस उपनिरीक्षक श्री. रहीम चौधरी, एएसआय रमेश शिरसाट, पोहेका किसान घोळवे, बाबुराव घुगे, प्रवीण उळे, बळीराम बासर, कल्याण देशमाने, नारायण गायकवाड, संग्राम सांगवे, शुभम राऊत, धम्मानंद वाव्हळ, रवी चव्हाण, जयदीप कसबे, राहुल भोसले, नवनाथ मुंडे, जसवंत शेप, बाबासाहेब डोंगरे, विवेकानंद सोळंके यांनी गुन्ह्याची उकल होण्यासाठी केलेल्या जलद व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे वरिष्ठांद्वारे सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!