- क्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन

- केज (प्रतिनिधी) : क्रांती नगर, कानडी रोड, केज येथे नागरिकांच्या विविध ऑनलाईन व डिजिटल सेवांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’ या सेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. 06 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या केंद्रामार्फत मोबाईल सेवा, ऑनलाईन पेमेंट सेवा, आधार कार्ड संबंधी सेवा, बँक खाते उघडणे, विविध प्रकारच्या KYC सेवा, लाडकी बहीण योजनेसह विविध शासकीय योजनांच्या पेमेंट व ऑनलाईन सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या सेवा केंद्राचे उद्घाटन लहुजी क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक तथा बहुजन ज्येष्ठ नागरिक मंचाचे प्रमुख बाबुराव गालफाडे यांच्या हस्ते संपन्न होणार असून, यावेळी दगडू तात्या गालफाडे, महादेव लांडगे, शीतलताई लांडगे, अनिल लोखंडे, प्रा. रमेश पाटोळे, उमेशजी आव्हाड, दिलीप गालफाडे, सय्यद शकील, इरफान पठाण, संतोष लांडगे, योगेश गायकवाड, अजय गालफाडे, सचिन गालफाडे, अखिल सय्यद, अमन तांबोळी, साहिल तांबोळी, बबन लांडगे यांच्यासह पत्रकार चंद्रकांत पाटील, विजय बिक्कड, प्रदीप गायकवाड, सचिन साखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांना विविध शासकीय व खासगी सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे प्रोप्रायटर पांडुरंग कसबे यांनी परिसरातील नागरिकांनी उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्याने सुरू होणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.




