छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवस्मारकचे सुशोभीकरण करण्यात यावे.
किल्ले-धारूर सकल मराठा समाजाची मागणी
*प्रतिनिधी:-(युवराज फुन्ने) आज किल्ले धारूर शहरातील “छत्रपती शिवाजी महाराज” अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच शिवाजी महाराज यांना हार घालण्यासाठी हायड्रोलीक सीडी बसविण्यात यावी तसेच संरक्षित कठडे (जाळी) बसविण्यात यावी. विद्युत रोषणाई करण्यात यावी तसेच शिवस्मारकच्या आजूबाजूला लावण्यात येणारे बॅनर फलक लावण्यात येऊ नये.शिवस्मारकाची स्वच्छता करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी मा.मुख्याधिकारी साहेब नगर परिषद किल्ले धारूर यांना समस्त शिवप्रेमीच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी निवेदनावर संदीप भैय्या शिनगारे, बाळूभाऊ कुरुंद प्रशांत शिनगारे, पवन धोत्रे, इंजि.जनक फुन्ने, दादा शेरकर,रोहित गायकवाड, ॲड. युवराज फुन्ने,निलेश शिनगारे,आदिनाथ शिनगारे यांच्यासह अनेक शिवप्रेमीच्या सह्याचे निवेदन देण्यात आले.
