ब्रेकिंग न्यूज
केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्नपत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळलेढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले.नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावाक्रांतीनगरमध्ये उत्साहात शिवजयंती; विद्यार्थ्यांचे विशेष नृत्य सादरीकरण, शिनगारे सरांचा सत्कारलातूर दौऱ्यावर लक्ष्मणराव वाघमारे; सामाजिक न्याय विभागाच्या १०१ शाखांची घोषणापरळीत ‘अखिल भारतीय महा पशुधन एक्स्पो 2026’ : शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे:- शेतकरी जनहित कामगार संघटनेचे जाहीर आवाहनसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा — लक्ष्मण वाघमारे यांचे आवाहन
केज:~ तालुक्यातील बनसारोळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय बाळासाहेब विनायक जाधव यांची शनिवारी (दि.१९) रोजी भारतीय जनता पक्षाच्या केज तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.
- अंबाजोगाई शहरातील आमदार नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाई येथील निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, पनगेश्वर कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा, केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत बाळासाहेब जाधव यांना पक्षाच्या केज तालुका सरचिटणीस पदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. राज्याच्या पर्यावरण व पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यांच्या निवडीच तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.

