Homeताज्या बातम्याबारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी.

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी.

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी

कुणबी प्रमाण पत्रामुळेच राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची श्रीकांत होरमाळे यांची भावना.

प्रतिनिधी : राम निर्मळ हिवरेकर

धारूर : दिवसेंदिवस शिक्षण हे सर्वसामान्यांसाठी महागडे आणि न परवडणारे त्याचबरोबर अतिशय स्पर्धेचे क्षेत्र होत चाललेले असतानाच समाजामध्ये काही तरुण असे असतात की,जे जिद्द,चिकाटी व कठीण परिश्रमाच्या बळावर आपले स्वप्न सत्यात उतरवतात.अशाच प्रकारची एक घटना/प्रसंग नुकताच राज्यसेवा परीक्षचा निकाल लागल्यानंतर पाहायला मिळाली.धारूर तालुक्यातील संगम या गावातील श्रीकांत होरमाळे या तरूणाने राज्यसेवा परिक्षेत 140 वा रँक मिळवत स्वतःचे स्वप्न सत्यात उतरले. श्रीकांत होरमाळे यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर दिंद्रुड येथून 6वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण श्रीकांत यांनी मराठी माध्यमातून पूर्ण केले. दहावी बोर्ड परिक्षेत 73% गुण मिळाल्यामुळे पुढील 11वी व 12 वीचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण करण्याचे होरमाळे यांनी ठरवले परंतु,12वी वर्गात शिकत असताना गणित विषय कच्चा असल्याने श्रीकांत यांना अपयश आले. तद्नंतर श्रीकांत यांनी 12 वीच्या दोन पुरवणी परीक्षा देत बारावी उत्तीर्ण केली. बारावीमध्ये असताना आलेल्या अपयशाला खचून न जाता पुढे स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय श्रीकांत यांनी घेतला व त्यासाठी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेत स्पर्धा परिक्षेची तयारी देखिल सुरू केली. 2015 साली श्रीकांत होरमाळे यांची पदवी पूर्ण झाली आणि तेव्हांपासून त्यांनी पुर्णवेळ युपीएससी च्या परिक्षेची तयारी करण्यासाठी वेळ देण्याचे ठरवले. 2015 – 2021 या कालावधीमध्ये श्रीकांत यांनी चांगल्या पद्धतीने युपीएससीची तयारी केली परंतु त्यांना यशाने थोड्या प्रमाणात हुलकावणी दिली. पुढे 2021 पासून श्रीकांत हे युपीएससी बरोबरच राज्यसेवा परीक्षा देखिल देत होते परंतु,यश काही त्यांना मिळत नव्हते. अशाही परिस्थितीत नकारात्मक न होता त्यांनी स्पर्धात्मक परिक्षांची तयारी सुरूच ठेवली. योगायोगाने 2023 – 2024 ला श्रीकांत यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले आणि राज्यसेवा परिक्षेत त्यांनी ओ बी सी प्रवर्गातून घवघवीत यश संपादन करून गट अ ची पोस्ट मिळवली. जर कुणबीप्रमाणपत्र मिळाले नसते तर मला गट ब च्या पदावर समाधान मानाने लागले असते अशी भावना श्रीकांत होरमाळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. राज्यसेवा स्पर्धा परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल श्रीकांत यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

जरांगे पाटलांच्या आरक्षण आंदोलनाचां फायदा

मागच्या दोन ते तीन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारावर ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष करीत आलेले आहेत. मला देखिल माझी कुणबी नोंद निघाल्यामुळे राज्यसेवा परिक्षेत गट अ चे पद मिळण्यासाठी फायदा झाला, त्यामुळे मी मनोज दादांचे धन्यवाद व आभार मानतो त्याचबरोबर यापुढेही मनोज दादांनी मराठा आरक्षणाचा लढा सुरूच ठेवावा यासाठी देखिल दादांना शुभेच्छा देतो अशी भावना श्रीकांत होरमाळे यांनी बोलताना व्यक्त केली.

ध्येय मिळवण्यासाठी चिकाटीने व सातत्यपुर्ण प्रयत्न गरजेचे

आपले जिवनातील ध्येय कोणतेही असो ते मिळवण्यासाठी प्रत्येकाने चिकाटीने त्याचबरोबर सातत्यपूर्ण प्रयत्न करते गरजेचे असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.आई वडिलांच्या कष्टाची जाण व स्वताःच्या आवडीचे क्षेत्र निवडुण कठीण परिश्रम घेत सातत्यपुर्ण प्रयत्न केल्यास यश हमखास मिळतेच असे देखिल शेवटी श्रीकांत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!