महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्यावतीने ज्येष्ठपत्रकार धनंजय कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
केज/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्यावतीने ज्येष्ठ पत्रकार
तथा सकल ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांचा दिनांक ०५ आॕगष्ट २०२५ वार मंगळवार रोजी वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह केज येथे पार पडला.
धनंजय कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार व रॉयल इंग्लिश स्कूल चे संस्थापक अध्यक्ष तथा सकल ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.ते समाजकार्यात सतत अग्रेसर व प्रसिद्ध व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी सत्कार समारंभासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,सचिव विजय बिक्कड, कार्याध्यक्ष नंदकुमार मिसाळ,पत्रकार विरोधी हल्ला समिती अध्यक्ष विश्वास राऊत,पत्रकार रोहन गलांडे,पत्रकार हिरामण काळे आदी पत्रकार उपस्थित होते.





