यू.वडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर
आयोजित कार्यक्रम संपन्न 
केज/प्रतिनिधी
आज दिनांक 23.07.2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर यू.वडगाव मंडळ,मा राकेश गिड्डे तहसीलदार साहेब केजयांच्या मार्गदर्शनाखाली आज निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी हे शिबिर संपन्न झालं या शिबिराचे अध्यक्ष माननीय विकास हजारे साहेब मंडळ अधिकारी हे होते,त्यांना खंबीर साथ सोनीजवळा तलाठी सौ आम्रपाली वाघमारे मॅडम यांची व त्यांच्या सर्व टीम ची होती,आज या शिबिराचा मुख्य उद्देश वयोवृद्ध ज्येष्ठांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, त्याप्रमाणे
1.तहसिल कार्यालय यांच्याशी निगडित ज्या व्यक्तीचे संजय गांधी श्रावण बाळ योजने अंतर्गत DBT,E-kyc कामकाज किंवा अर्ज प्रलंबित असतील
2 .कृषी विभाग बाबत PM-Kisan तसेच काही प्रलंबित विषय
3 .पुरवठा विभाग बाबत राशन कार्ड संदर्भात अर्ज
4 .शेतकरी, विद्यार्थी,व महिला यांना रहिवासी, उत्पन्न जातींचे दाखले या बाबत अडचणी
5 . Agristack (शेतकरी कार्ड, वरील प्रमाणे सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला,त्याबद्दल सोनीजवळा येथील नागरिकांच्या वतीने या शिबिरासाठी आलेल्या नागरिकांचे अधिकारऱ्याचे कर्मचारी यांचे आभार सोनीजवळा सरपंच सौ जानवी गोविंद ससाणे यांनी केले
