राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या केज तालुकाध्यक्षपदी अमर भैया पाटील यांच्या निवडीला सर्व स्तरातून जंगी प्रतिसाद

केज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने केज तालुक्यातील राजकारणात सक्रीय व लोकसंग्रही नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्री.अमर अशोकराव पाटील यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल जी तटकरे व आ. धनंजय मुंडे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती जाहीर झाली असून, पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष अॕड.राजेश्वर चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करत नियुक्तीपत्र दिले.
राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ओळख असलेले अमर भैय्या पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,धार्मिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत.अठरापगड जातीतील युवकांना सोबत घेऊन त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून,गरीब-शोषित वर्गासाठी सतत कार्यरत राहिले आहेत.
ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा केज तालुक्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम ते प्रामाणिकपणे करतील, असा विश्वास जिल्हा व राज्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.या निवडीमुळे केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गट कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,सर्वत्र अमर भैय्या पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
