Homeसामाजिकलोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्काराने पत्रकार तात्या गवळी सन्मानित*

लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्काराने पत्रकार तात्या गवळी सन्मानित*

*लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्काराने पत्रकार तात्या गवळी सन्मानित*

केज/प्रतिनिधी

आपल्या लेखनातून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार तात्या गवळी कायम तत्पर असणारे चळवळीत सक्रिय राहुन आंबेडकर चळवळीतील बुलंद तोफ अल्पावधीतच लोकप्रिय होऊन सर्वांसाठी आपलेसे वाटणारे ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कै. प्रमोद लांडगे युवा मंच च्या वतीने २०२५ च्या लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्काराने पत्रकार तात्या गवळी यांना सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये उलखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना कै. प्रमोद लांडगे युवा मंचच्या वतीने पुरस्कार देण्यात येत आहे. पत्रकारीतेच्या व सामाजिक कार्यातून सतत अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लेखणीच्या माध्यमातून उपेक्षितांना न्याय मिळवून देत आहेत. पत्रकार तात्या गवळी हे त्यांच्या निर्भीड लेखणीच्या माध्यमातून अन्याला वाचा फोडून गोरगरिबांना सतत न्याय देण्याचे काम करत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत कै. प्रमोद लांडगे विचार मंचच्या वतीने पत्रकार तात्या गवळी यांना २०२५ चा लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी पुरस्कार सत्कारमूर्ती पत्रकार तात्या गवळी,कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नगराध्यक्ष सौ.सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून गटनेते राजूभाई इनामदार, गटनेते भाऊसाहेब गुंड, युवा नेते लखन भैय्या हजारे, वंचितचे प्रवीण मस्के, जनविकास फाउंडेशनचे सचिव विजय लांडगे, दैनिक बीड युवामंतचे संपादक अशोक नागरगोजे , वादळ महाराष्ट्र चे संपादक मुबाशीर खतीब, दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रोहित कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकीत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पत्रकार तात्या गवळी म्हणाले की, हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणा देणारा आहे या पुरस्काराची प्रेरणा घेऊन मी पत्रकारितेत व सामाजिक कार्यात अग्रेसर राहून अन्याला वाचा फोडून गोरगरिबांना न्याय देण्याचे प्रमाणिक काम करेल. पुढे बोलताना गवळी म्हणाले की, या पुरस्काराच्या माध्यमातून समाज बांधवांनी माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे संभाळण्याचे काम करेल. यावेळी भीम नगर, सिद्धार्थ नगर भागातील युवक- युवती, महिला, नागरिक व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन हजारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व उपस्थित त्यांच्या आभार रोहित कसबे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान आयुष्यातील संघर्षाची...

नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान आयुष्यातील संघर्षाची आठवण करून देणारा भावनिक क्षण- शितल लांडगे   केज | प्रतिनिधी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

केज शहरात शोककळा : अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने हळहळ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला...

केज शहरात शोककळा : अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने हळहळ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद  केज | प्रतिनिधी :- राज्याचे उपमुख्यमंत्री...

झेडपी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार  जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज पुनरुज्जीवनासाठी 500...

झेडपी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज पुनरुज्जीवनासाठी 500 माजी विद्यार्थी सरसावले केज | प्रतिनिधी:- अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत दर्जेदार शिक्षण ही...

राजेगाव जि. प. प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

राजेगाव जि. प. प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केज / प्रतिनिधी : केज तालुक्यातील राजेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात...

आदर्श ग्रा.पं.कोल्हेवाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

आदर्श ग्रा.पं.कोल्हेवाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. केज / प्रतिनिधी :- दि.२६ जानेवारी रोजी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व...

error: Content is protected !!