Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षे विषयी शिक्षण विभागाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होते...

विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षे विषयी शिक्षण विभागाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होते का ? याबाबत सर्व शाळांची शिक्षण विभागा मार्फत चौकशी करण्यात यावी – सेवकराम जाधव

विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षे विषयी शिक्षण विभागाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होते का ?

याबाबत सर्व शाळांची शिक्षण विभागा मार्फत चौकशी करण्यात यावी – सेवकराम जाधव

परळी वैजनाथ :

                     बीड येथे ट्युशन क्लासेस मध्ये विद्यार्थिनी सोबत घडलेल्या विकृत घटणेमुळे संबंध महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रास मोठा धक्का बसला असून त्याकारणाने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निश्चितच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भवितव्य म्हणत असताना तेच जर सुरक्षीत नसतील तर देशाचे भविष्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

       तथापि विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेच्या बाबतीत शाळा आणि शिकवणी क्लासेसच्या ठिकाणी येणारे संभाव्य धोके टाळण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव व पत्रकार केशव मुंडे यांच्या वतीने परळी येथील गटशिक्षणाधिकारी श्री एस.एम.कनाके यांना निवेदन देण्यात आले आहे.

  यामध्ये प्रामुख्याने परळी तालुक्यातील शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी व खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता प्रत्येक शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी व शौचालय (वॉश रूम) आहे का ? त्याच बरोबर सुरक्षेचा विचार करता प्राथमिक उपचार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन परिस्थितीत ज्वलन प्रतिरोधक साधनं (फायर किट) आहेत का ? तसेच शाळेचे बिल्डिंग फिटनेस कसे आहे ? या बाबींची इत्यंभूत चौकशी करण्यात यावी.

        सद्यपरिस्थितीत स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसाठी ट्युशन क्लासेसची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. मात्र क्लासेस मध्ये वरील सर्व सुविधा उपलब्ध आहेत का ? त्याच बरोबर परळी शहरात एकूण किती (ट्युशन) क्लासेस चालतात, कुठे कुठे चालतात, त्यासर्व संचालकांची नावं आणि त्यांचा पत्ता याची सर्व आकडेवारी निश्चित करण्यात यावी. जेणेकरून त्या क्लासेस मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण होणार नाहीत.

सदरील निवेदनाची दखल घेत याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री एस. एम. कनाके यांनी निवेदनातील सूचना व मागण्यांची त्वरीत पूर्तता करण्याच्या दृष्टीने वरिष्ठांशी बोलुण कार्यवाही केली जाईल असा शब्द दिला.

       विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षे विषयी शिक्षण विभागाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन सर्व शाळांद्वारे होते किंवा नाही याबाबत शिक्षण विभागा मार्फत चौकशी करावी. अशी मागणी सेवकराम जाधव, केशवराव मुंडे यांनी परळीचे गटशिक्षणाधिकारी एस. एम. कनाके यांच्याकडे निवेदणाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!