साबला नगरीत तननाशक औषध फवारणी .
केज – प्रतिनिधी .
तालुक्यातील साबला या नगरीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने तननाशक औषधांची फवारणी करण्यात आली . सरपंच जनाबाई नरहरी काकडे , उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे , ग्रामपंचायत अधिकारी शिंपले तानाजी आश्रुबा यांच्या मार्गदर्शनाखाली .
साबला या नगरीत नेहमीच स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून . याचे कारण म्हणजे गावात रोगराई पसरु नये तसेच , गावातील वातावरण स्वच्छ रहाव . स्वच्छ गाव , सुंदर गाव . तसेच झाडे लावा , झाडे जगवा , पाणी अडवा , पाणी जिरवा . या नुसार साबला नगरीतील कामकाज चालत आहे .
साबला नगरीत तननाशक औषधांची फवारणी समाजसेवक नरहरी काकडे , ग्रामपंचायत सदस्य माऊली पांचाळ , ग्रामपंचायत कर्मचारी गुलाब मुळे , विश्वनाथ नाईकनवरे , तसेच बाबासाहेब काकडे , रामराजे काकडे , विकास सरवदे , लक्ष्मण कटारे या वेळी इत्यादींची उपस्थिती होती .
