Homeताज्या बातम्या2023 मध्ये बीड जिल्ह्यात गाजलेल्या महालक्ष्मी कला केंद्र उमरी ता.केज मधील पोस्को ...

2023 मध्ये बीड जिल्ह्यात गाजलेल्या महालक्ष्मी कला केंद्र उमरी ता.केज मधील पोस्को  गुन्ह्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता…..

2023 मध्ये बीड जिल्ह्यात गाजलेल्या महालक्ष्मी कला केंद्र उमरी ता.केज मधील पोस्को  गुन्ह्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता…..

केज:- येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष पोस्को केस क्र. १७७/२०२३ सरकार वि .सत्वशीला प्रकरणाची सुनावणी होऊन सर्व आरोपिंची मा. न्या.एस बी भाजीपाले यांनी दि.११/०८/२०२५ रोजी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

सदरील प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, दिनांक 07/07/2023 रोजी रात्री 03.00 वा सुमारास शासनाने विहीत केलेल्या निर्धारीत वेळेपेक्षा महालक्ष्मी कला केंद्र हे मॅनेजर नामे लहू रामहारी अंधारे, यातील नृत्य करणाऱ्या महिला सर्व रा. महालक्ष्मी कला केंद्र उमरी ता केज या मिळुन आल्या तसेच महालक्ष्मी कला केंद्रातील नृत्य पाहण्यासाठी आलेले इसम असे अनेक जण मिळुन आले. तसेच महालक्ष्मी कला केंद्रावरील अल्पवयीन ४ मुली याना नृत्यासाठी

बोलावुन त्यांचे लैंगिक शोषनास उपलब्ध करुन दिले. तसेच अल्पवयीन मुलीवर अनोळखी इसमानी वारंवार शारीरीक संभोग केला आहे. तसेच सदर कलाकेंद्र चालक सत्वशीला बाबासाहेब आंधारे व रत्नाकर शिंदे यानी स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसायासाठी कलाकेंद्रात परवानगी दिली. सदर पिडीत ही अल्पवयीन व दलीत समाजाच्या असल्याने माहीत असताना त्यांच्यावर दबाव टाकुन व पैशाचे अमीष दाखवुन त्यांचा वेश्याव्यवसायासाठी वापर केला म्हणून माझी कलम 188,109,114,290,34,370(4)(5) 370 (अ), 373, 376 (फ) (आय) भा.दं.वि सह कलम 4,6,17,18,21 बालकाचे लैंगिक अत्याचार अधिनीयम, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,6,8,9, बालकांची काळजी व संरक्षण अधिनीयम 2015 चे कलम 75,79, तसेच अ.जा.ज.अ. प्र.का कलम 3(2) (V), मुं.दा.का. कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा करण्यात येऊन प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी करून सर्व २७ आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी मा.न्यायालयात झाली असता फिर्यादी तर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. परंतु सरकार पक्ष हा गुन्हा सिद्ध करू न शकल्याने व आरोपींच्या वकिलांचा बचाव गृहीत धरून सर्व आरोपी यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणातील आरोपी लहू अंधारे,शीतल अंधारे, संगीता काळे,संतोष बडगे हे 4 सर्व आरोपी प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कारागृहात होते.व इतर आरोपी हे जामिनावर होते. सदर वर नमूद आरोपीतर्फे ऍड.अजित लोमटे यांनी काम पाहिले त्यांना ऍड संस्कार शिनगारे, ऍड चंद्रकांत जाधव,ऍड ओमप्रकाश धोत्रे, ऍड अभिजित सोळंके यांनी सहकार्य केले. सदर प्रकरणाकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!