शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे २४ जुलै रोजी चक्काजाम आंदोलन

वडवणी | प्रतिनिधी
शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांच्या न्याय मागण्यासाठी दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा ते एक दरम्यान राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. हे चक्काजाम आंदोलन परळी बीड राष्ट्रीय महामार्ग वर छत्रपती शिवाजी महाराज चौक वडवणी येथे शांततेच्या मार्गाने होणार असून अशा आशयाचे निवेदन माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन खेड पोलीस स्टेशन वडवणी यांना देण्यात आलेले आहे. हे आंदोलन करण्यामागचे उद्दिष्ट शेतकरी कर्जमाफी तात्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, आदेशाचे अंमलबजावणी व इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात यासाठी सदरील आंदोलन करत असताना रुग्णवाहिका, अग्निशामक, आपत्कालीन वाहने संरक्षक यांना कोणताही अडथळा होणार नाही, ध्वनी प्रदूषण सार्वजनिक संपत्तीचे नुकसान टाळले जाईल, याकामी दिलेल्या निवेदनावर प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संकेत लंगडे, उपाध्यक्ष शेंडे, शहराध्यक्ष चेतन, युवा तालुका अध्यक्ष पुष्कराज चव्हाण, सरचिटणीस विकास गवळी यांच्यासह विकास बाप्पा मुळे, तालुका शिवसेना गट उद्धव बाळासाहेब ठाकरे महादेव आप्पा जमाले, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट मुकुंद रामेश्वर सुरवसे, सरपंच देवगाव सह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत





