कानडी रोड केज येथील सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे सभागृहाचे काम प्रगती पथावर

केज | प्रतिनिधी
क्रांती नगर, कानडी रोड केज येथे नगर पंचायत केजच्या वतीने विशेष फंडातून मा.लोकप्रिय नगराध्यक्ष सिताताई बनसोड, जनविकास परिवर्तनचे आघाडीचे प्रमुख मा.हारून भाई ईनामदार, तसेच नगरसेवक मा. अझहर भाई ईनामदार यांच्या विशेष प्रयत्नातून जवळपास १० लाख रुपये मंजूर करून, दोन महिन्यापासून ३० बाय २० चे सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे सामाजिक सभाग्रहाचे काम सुरु आहे. या ठिकाणी सभागृह व्हावे, याकरीता सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे सर, यांच्यासह लक्ष्मण जाधव, मा.नगरसेवक, सय्यद शकील, इरफान पठाण, महादेव लांडगे, पांडुरंग कसबे यांच्या मार्फत अनेकदा अर्ज, निवेदने देऊन आंदोलने केलेली आहेत.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बाबुराव गालफाडे सर म्हणाले की, येत्या २६ नोव्हेंबर २०२५ सविंधान दिनापर्यंत या सभाग्रहात सुसज्य असे सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने वाचनालय सर्वांच्या सहकार्याने सुरु करणार आहोत. तसेच सभाग्रह मंजूर करून बांधकाम सुरु केल्या बद्दल नगर नगराध्यक्ष, गट प्रमुख, नगरसेवक, तसेच पालिका पदाधिकारी, यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.





