- ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले.

- बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक व साहित्य वाटप करून होणार साजरा
इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री मा.ना. अतुलजी सावे साहेब यांचा वाढदिवस दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आहे. परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहिरात बॅनर, पोस्टर किंवा होर्डिंग लावू नयेत, असे आवाहन मा.ना. अतुलजी सावे साहेब यांनी केले आहे.
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महात्मा फुले युवा दलाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरविले की वाढदिवसानिमित्त होणारा बॅनर व जाहिरातीवरील खर्च टाळून तो निधी गोरगरीब व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तसेच अनाथ आश्रमातील मुलांना एका दिवसाच्या जेवणासाठी देण्यात यावा.
त्या अनुषंगाने आज पसायदान सेवा प्रकल्प येथे विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसोबत आम्हीही जेवण केले.
यावेळी महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख अँड सतीश शिंदे व बीड जिल्हा उपप्रमुख संजय काळे, महात्मा फुले युवा दल पाटोदा तालुकाप्रमुख गणेश मोहळकर तसेच पसायदान सेवा प्रकल्पाचे दराडे सर उपस्थित होते.




