आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनाचा उत्सव

आज 12 ऑगस्ट 2025
आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,बनसारोळा येथे रक्षा बंधनाचा सण पारंपरिक पद्धतीने, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर राखी बांधून बंधुत्व, स्नेह आणि ऐक्याचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात रक्षाबंधनाचे महत्त्व, भावनिक भाषणांनी झाली. या
उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांबद्दल आदर, मदतीची भावना, आणि जबाबदारीची जाणीव दृढ झाली.
सणाच्या निमित्ताने आपली संस्कृती, परंपरा आणि मूल्यं जपण्याचा संकल्प सर्वांनी केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम, श्रीमती साळुंखे मॅडम, राठोड मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.. छायाचित्रांमधून या मंगलमय क्षणांचा आनंद आपण अनुभवू शकता.
सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!




