Homeताज्या बातम्याझेडपी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार  जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज...

झेडपी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार  जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज पुनरुज्जीवनासाठी 500 माजी विद्यार्थी सरसावले

झेडपी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज पुनरुज्जीवनासाठी 500 माजी विद्यार्थी सरसावले

केज | प्रतिनिधी:- अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत दर्जेदार शिक्षण ही आजच्या काळातील अत्यावश्यक गरज बनली आहे. मात्र वाढत्या खासगी शिक्षण संस्थांच्या अवाजवी शुल्कामुळे सामान्य कुटुंबांना शिक्षणासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत मातृभाषेतून विनामूल्य आणि दर्जेदार शिक्षण देणारी शासकीय शाळा ही समाजासाठी अमूल्य देणगी ठरते.

केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही अशीच एक गौरवशाली शाळा असून 1959 पासून आजपर्यंत या शाळेने एक लाखाहून अधिक विद्यार्थी घडवले आहेत. या शाळेतील विद्यार्थी आज केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, खासदार, नगराध्यक्ष, आयुक्त, डॉक्टर, अभियंते, अभिनेते, प्राचार्य, पोलीस अधिकारी, शासकीय सेवेत उच्च पदांवर तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

मात्र खाजगी शाळांचा सुळसुळाट, शिक्षकांची अनास्था, शाळेच्या जागेचे वाढलेले मूल्य आणि त्यातून शाळा बंद पाडण्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्नांची माहिती काही माजी विद्यार्थ्यांना मिळताच अस्वस्थता पसरली. ही अस्वस्थता लवकरच एकजुटीच्या संतापात रूपांतरित झाली.

व्हॉट्सॲपद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 26 जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात 500 हून अधिक माजी विद्यार्थी एकत्र जमले. ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर या विद्यार्थ्यांनी बॅनर, फलक आणि ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून केज शहरात जनजागृती फेरी काढली.

या फेरीदरम्यान विनामूल्य शिक्षण, शैक्षणिक साहित्य, शिकवणी आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देत पालक व विद्यार्थ्यांना शासकीय शाळेकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले.

माजी विद्यार्थ्यांनी तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभागाशी सातत्याने संपर्क ठेवत पाठपुरावा केला. त्यानंतर तहसीलदार श्री. राकेश गिड्डे यांनी गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख आणि माजी विद्यार्थी समितीच्या संयोजकांसोबत सविस्तर चर्चा करत शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी शाळेसाठी इमारत दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था आणि शिक्षक नियुक्ती यासह सर्व शासकीय सुविधा तत्काळ देण्याचे आदेश देण्यात आले.

विशेष म्हणजे तहसीलदार श्री. राकेश गिड्डे यांनी वैयक्तिक सहभाग म्हणून आठवड्यातून एक तास अध्यापनासाठी देणे आणि पाच सायकल्स देणगी स्वरूपात देण्याची घोषणा केली.

या आंदोलनाला उपस्थित माजी विद्यार्थी आणि केजमधील जागरूक नागरिकांनी विनाशर्त पाठिंबा देत चार वर्गखोल्यांच्या दुरुस्ती/पुनर्बांधणीसाठी, क्रीडा व शैक्षणिक साहित्याकरिता आणि जवळपास 3 लाख रुपयांचा मदतनिधी जाहीर केला.

याच वेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जागेवरच 11 विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश घेतला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा केलेला सन्मान पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सुमारे 6 तास चाललेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थिती, जनजागृती, मदत आणि ठाम संकल्प पाहता ही बातमी बीड जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली आहे. शाळा पूर्ववत करून त्यातून दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे. मराठी शासकीय शाळा बंद पडत असताना माजी विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल शिक्षण क्षेत्रात निश्चितच मोठा बदल घडवेल, अशी प्रतिक्रिया देत “आम्ही गावकरी स्वतः लक्ष घालून ही शाळा उभी करू,” असा ठाम विश्वास भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न केज (प्रतिनिधी) : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नवीन न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला...

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

error: Content is protected !!