Homeताज्या बातम्याकेज शहरात शोककळा : अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने हळहळ, सामाजिक...

केज शहरात शोककळा : अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने हळहळ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद 

 केज | प्रतिनिधी :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर नेतृत्व माननीय अजित दादा पवार यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाल्याची बातमी समजताच केज शहरासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली. आपल्या लाडक्या नेत्याच्या अकाली जाण्याने जनतेमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत असून केज शहरात सर्व व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने कडकडीत बंद पाळत दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

केज येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित कसबे, शरद थोरात, मजहर तांबोळी, प्रियांकाताई लांडगे, अझर इनामदार, शितलताई लांडगे, महादेव लांडगे, लिंबराज गायकवाड, बाळासाहेब जाधव आदींनी शहरात शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोणतेही राजकीय आवाहन नसताना स्वयंस्फूर्तीने आपले सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवले.

सकाळपासूनच केज शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले, लहान-मोठी दुकाने बंद होती. शहरातील विविध चौक, सार्वजनिक कार्यालये व प्रमुख ठिकाणी अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी समाजातील सर्व घटक, व्यापारी संघटना, युवक, महिला, शेतकरी तसेच सर्व पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय मतभेद विसरून सर्वांनीच दादांच्या विकासाभिमुख कार्याची, शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेले भरीव कार्य, विकासाची दृष्टी आणि प्रशासनावरील मजबूत पकड कायमच जनतेच्या स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रभावी, निर्भीड आणि लोकहितासाठी सतत झटणारे नेतृत्व गमावल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

दिवसभर केज शहरात शांतता व शोकमय वातावरण पाहायला मिळाले. “दादा अमर रहें”च्या घोषणांनी आणि अश्रूंच्या साक्षीने केजकरांनी आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न केज (प्रतिनिधी) : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नवीन न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला...

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

error: Content is protected !!