*विवेकानंद सेवा सामाजिक प्रतिष्ठान व टोकवाडीकरांच्या वतीने महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक ,जलसंपदा विभागामध्ये निवड झालेल्यांचा सत्कार संपन्न*

परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील विवेकानंद सेवा सामाजिक प्रतिष्ठान व समस्त टोकवाडी ग्रामस्थांच्या वतीने नुकत्याच महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक व जलसंपदा विभागामध्ये निवड झालेल्याचा सत्कार समारंभ विवेकानंद हॉस्पिटल चे सर्वेसर्वा मा. श्री भरत मुंडे साहेब एम एस सर्जन (विवेकानंद हॉस्पिटल परळी वैजनाथ) संभाजी जनार्दन मुंडे उपाध्यक्ष विवेकानंद सेवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने टोकवाडी येथे उत्साहात पार पडला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य इंटकचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय गुट्टे साहेब, ह भ प भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे यांनी सर्वांना शुभेच्छा रूपी आशीर्वाद देण्यात आले,रत्नेश्वर विद्यालयाचे प्राचार्य पी टी मुंडे सर, परळी पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे ,भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय मुंडे सर ,जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष नाथराव मुंडे, रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह भ प युवा कीर्तनकार जगदीश महाराज सोनवणे, उद्योजक नवनाथ दशरथ मुंडे, भाजप नेते तुकाराम मुंडे , तंटामुक्तीचे अध्यक्ष वाल्मीक मुंडे, प्रा. शरद रोडे ,उपसरपंच अंगद काळे ,संजय श्रीराम मुंडे, डॉ. संदीपानजी काळे माजी उपसरपंच, महादेव जनार्दन मुंडे, श्रीराम मारुती मुंडे ,दिलीप भालेराव ,माणिक मुंडे ,अमर रोडे, बंडू काळे ,भानदास बापू मुंडे ,भगवान बाबा गणेश मंडळ चे सर्व सदस्य गावातील सर्व महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक व जलसंपदा मध्ये उत्तीर्ण झालेले सर्व सत्कारमूर्ती यांचा ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात फेटा ,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक व जल संपदाचे उमेदवारांनी अक्षरशः टोकवाडी ग्रामस्थ त्यांच्या या उत्साह पाहून भारावून गेले या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री डॉ. भरत मुंडे साहेब एम एस सर्जन ( विवेकानंद हॉस्पिटल परळी वैजनाथ) ,संभाजी जनार्दन मुंडे उपाध्यक्ष विवेकानंद सेवा सामाजिक प्रतिष्ठान यांनी वेळोवेळी ग्रामस्थांच्या वतीने निवड झालेल्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.




