आझाद क्रांती सेना च्या वतिने होत असलेल्या वडवणी येथील गायराण आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने शामील व्हा : अशोक ढगे
माजलगाव : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील गायराण जमीनी येथील शोषीत पिडीत लोक वर्षानूवर्षे जमीनी कसून आपल्या कूटूंबाचा उदरनिर्वाह करीत असून राज्य शासनाने या जमीनीवर मोठमोठे प्रकल्प उभारण्याचे काम प्रशासन करत असून त्या प्रकल्पाला आझाद क्रांती सेना व गायराण जमीनी कसणार्या लोकांचा कडाडून विरोध असून शासनाने त्या जमिनिवर प्रकल्प उभारू नये. म्हणून आझाद क्रांती सेनेचे सेना प्रमुख राजेशजी घोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा निघणार असून शासनाने लादलेला काही प्रमूख मागण्या व प्रकल्प मागे घेण्यात यावे. त्याचप्रमाणे गायरान जमीनी कसणार्यांच्या नावे करण्यात याव्यात,सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, इंदू मिल येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक तात्काळ उभारण्यात यावे, निराधार योजनेला ६००० मानधन देण्यात यावे, गायराण कस्तकर्यांच्या नावे करण्यात यावे, महात्मा फूले व अण्णाभाऊ साठे महामंडळाला भरीव निधि थेट देण्यात यावा. मेडीकलचे भाव कमी करण्यात यावे या व इतर मागण्यासाठी बीड जिल्ह्यातील वडवणी तालूक्यात दि.१० जुलै २०२५ रोजी होणार्या मोर्चात हजारोंच्या सख्येने शामील होण्याचे अव्हान माजलगावचे तालूकाप्रमूख अशोक ढगे, ता.सचिव किसन भिसे,गणेश कांबळे,मन्यासूर्या कांबळे,कैलास गायकवाड,व अकाश हतागळे यांनी केले आहे.
