ग्रामऊर्जा फाउंडेशन ची योजना वारी.
धारूर:
ग्रामऊर्जा ह्यूमन डेव्हलोपमेंट फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातुन या वर्षी योजना वारी चे आयोजन करण्यात आले होते. या वारी मध्ये टाळ मृदूंगा बरोबर विविध शासकीय योजनांचा देखील जयघोष होता.
शासनाच्या हजरो योजना आहेत परंतु माहितीच्या आभावामुळे, अपुऱ्या कागदपत्रा मुळे, तसेच वेळेत माहिती नं मिळाल्या मुळे, अनेक गरजु लाभार्थी योजनानं पासुन वंचित राहतात, हिच गोष्ट लक्षात घेऊन ग्रामऊर्जा फाउंडेशन च्या माध्यमातुन विविध योजनांची जनजागृती या वारी मधुन करण्यात आली.
या वारी मध्ये विविध योजनांचे माहिती फलक, पोस्टर दाखवून त्यावर गावकर्यांन सोबत चर्चा करण्यात आली.
मोठ्या उत्साहाने योजना वारी मध्ये भाजणी मंडळ, महिला, शेतकरी, विद्यार्थी व ग्रामऊर्जा टीम उपस्थित होती.
