नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान
आयुष्यातील संघर्षाची आठवण करून देणारा भावनिक क्षण- शितल लांडगे
केज | प्रतिनिधी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने मासाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या मा. शितल महादेव लांडगे यांना “संघर्ष नायिका 2026” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिल्याने हा क्षण अत्यंत भावनिक असल्याची भावना शितल लांडगे यांनी व्यक्त केली. आंबेडकरी चळवळीत दिलेले योगदान, सामाजिक न्यायाच्या दिशेने सातत्याने केलेले कार्य आणि महिलांच्या हक्कांसाठीचा लढा या अनुषंगाने त्यांची निवड करण्यात आली.
या सन्मानाबद्दल त्यांनी मा. बा.रा. वाघमारे सर, अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स नांदेडच्या संपूर्ण टीमचे तसेच आयोजक व पुरस्कार निवड समिती प्रमुख ॲड. सुजाता पोहरे, सहआयोजक शेख शकीला यांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रज्ञा वाघमारे, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका कर्तृत्ववान महिलेला मिळालेला हा सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




