भाजपच्या “राज्य परिषद” सदस्यपदी सतीश मुंडे यांची नियुक्ती

_मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे सतीश मुंडे यांनी मानले आभार_

सतीश मुंडे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे व माजी खा.प्रितमताई मुंडे यांचे विश्वासू भाजपाचे माजी परळी तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांची भारतीय जनता पार्टी “राज्य परिषद” सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री ना.पंकजाताई मुंडे व मा. खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांचे सतीश मुंडे यांनी आभार मानले आहेत. दरम्यान मंत्री पंकजाताई मुंडे व मा. खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन नवनियुक्त सदस्य सतीश मुंडे यांनी केले.
परळी वैजनाथ भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष, पंचायत समितीचे माजी सदस्य,भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढीसाठी योगदान देणारे अशी ओळख असलेले सतीश मुंडे यांची भारतीय जनता पार्टी “राज्य परिषद” सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सतीश मुंडे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यापासुन निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. जिल्ह्यात दांडगा संपर्क असुन जनसामान्य कार्यकर्ते सोबत घेऊन चालणारे , पक्षनिष्ठा असलेले व संघटनात्मक वाढीसाठी कठोर परिश्रम घेणारे तसेच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन असामान्य कर्तृत्व निर्माण व सिद्ध करण्याची जी कला प्रत्येकाला अवगत नसते पण ती कला यांनी कमी वेळेमध्ये अवगत केली, सामाजिक, धार्मिक, राजकीय, कार्यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवत आपल्या कार्याची चुणूक दाखवून त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले आहेत. तालुकाअध्यक्ष या पदावर असतांना परळी तालुक्यात गाव तिथे भाजप व घर तिथे भाजपचा कार्यकर्ता या पद्धतीने काम करत चांगले योगदान देत काम केले आहे. भाजपमध्ये विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पारपाडली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडीवर योगदान दिले आहे. गेल्या पाच वर्षात तालुकाध्यक्षपद सक्षमपने संभाळले आहे. अनेक अडचणी च्या काळातही त्यांनी आपली भूमिका चोख पणे संभाळली आहे. पंकजाताई मुंडे व डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पक्षाचे शहर तसेच ग्रामीण भागात सचोटीने पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. भाजप पक्षाची विचारधारा प्रत्येकाच्या घराघरात पोचविण्याचे काम केले. पंकजाताई मुंडे व डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी बळकट करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या याच पक्षनिष्ठेची पावतीच म्हणून व त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन सतीश मुंडे यांची भारतीय जनता पार्टी “राज्य परिषद” सदस्यपदी नियुक्ती केली आहे. तसेच सतिश मुंडे हे ना.पंकजाताई मुंडे व मा. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे अत्यंत विश्वासू असून या पुर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहीलेले आहे. परळी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचेही ते अध्यक्ष होते. सतीश मुंडे यांची भारतीय जनता पार्टी “राज्य परिषद” सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल परळी वैजनाथसह बीड जिल्ह्यातुन राजकिय , सामाजिक, शैक्षणिक तसेच सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ना.पंकजाताई आणि मा.खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी भाजपच्या “राज्य परिषद” सदस्यपदी निवड करून माझ्यावर खुप मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवून भाजपाचे काम वाढविणार असल्याचे सांगून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन सतीश मुंडे यांनी केले.भाजपच्या “राज्य परिषद” सदस्यपदी सतीश मुंडे यांची नियुक्तीबद्दल परळी मतदारसंघातील प्रत्येक गावात या निवडीचे स्वागत करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!